पोस्ट्स

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव :  मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती,धाराशिव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे भव्य ध्वजारोहण होणार असून त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती पदी राष्ट्रवादी पार्टीचे नेते संजय निंबाळकर  असणार आहेत तसेच सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य किल्ला सजावट, भवानी माता पूजन व LED लेझर लाइटिंग डेकोरेशनचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्य मंत्री तथा तुळजापूर धाराशिव चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंत नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक असणार आ...

नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सत्कार

इमेज
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सत्कार उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार अतुल कुलकर्णी यांनी नुकताच स्वीकारला आहे. नव्याने रुजू झाल्यानंतर नूतन पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग व मुस्लीम बांधवांच्या वतीने आज (दि.14) स्वागत व सत्कार करण्यात आला.   पोलीस मुख्यालयात झालेल्या या सत्कार समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कार समारंभानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती व त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, आयाज शेख, असदखान पठाण, अन्वर शेख, समियोद्दीन मशायक, अफरोज पीरजादे, वाजीद पठाण, इस्माईल शेख, अन्सार रजवी, इम्तियाज बागवान, साबेर शेख गुड्डू शेख आदीसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Daily online

 Daily online